उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने सप्टेंबर /ऑक्टोबर 2015 मध्ये सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परिक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 12 वी साठी 02382-251633 या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडचणी विषयी पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संर्पक साधावा उस्मानाबाद जिल्हा- श्री.पवार के.बी. (मो.नं.9421361543), श्रीमती चंदनशिवे एस.जे.(मो.नं.9527296605).