उस्मानाबाद : राष्ट्रसंत प.पु. भैय्युजी महाराज यांच्या अस्तिकलशाचे व पादुकांचे रविवारी सकाळी 11.00 वा उस्मानाबादेत आगमन झाल्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मोठया संख्येने महाराजांचे भक्तगण उपस्थित होते. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
रविवार दिनांक 15 रोजी प. पु. राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या अस्तिजलकलश व पादुका तुळजापुर येथे अगमन झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीमहाराजांच्या  पुतळयाजवळ पादुकांच्या दर्शनासाठी व  श्रध्दाजंली वाहण्यासाठी ठेवण्यात आल्या. तुळजापुर शहर व परिसरातुन सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 2.00 वा नळदुर्ग कडे यात्रा प्रस्थान झाली. सुर्येदय शिक्षण संकुल मुर्टा गावात पदयात्रा काढण्यात आली. मुर्टा, होरटी, चीकुंद्रा, मानमोडी, जळकोट आदि परिसरातील हजारो भावीकांनी दर्शन घेतले व सर्व भावीकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दि. 16 रोजी होर्टी येथे पदयात्रा काढुण यात्रेचे उस्मानाबाद येथे आगमन झाले. राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांच्या अस्ती कलशाचे व पादुकाचे ‍उस्मानाबादेत आगमन झाल्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कुल मधील प्रागंणामध्ये अस्तिकलश व पादुका दर्शनासाठी व श्रध्दाजंली वाहण्यासाठी सकाळी 11ते दुपारी 1 यावेळेत ठेवण्यात आल्या. सुर्येदय परिवाराचे जिल्हा संघटक मा . सुधीर आण्‍णा पाटील काल यांनी केलेल्या आवाहनानुसार या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गुरुबंधू उपस्थित होते  .नगरसेवीका सौ. प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते अस्तिकलश व पादुकांचे पुजन करण्यात आले. या प्रंसगी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना व गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्या बरोबर रोपटयांचे  वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी भैय्युजी महाराजांविषयी आपल्या मनातील आठवणी ताज्या केल्या यावेळी मोठया संख्येने उस्मानाबाद शहरातील व परिरातील गुरुबंध उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे सदस्य प्रेमा ताई पाटील, संस्थेचे सचिव कैलास चिंनगुंडे, शशिकांत निंबाळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अभिराम पाटील, डॉ. चंचला बोडके, डॉ. वसुधा दापके. डॉ. दिग्‍गज दापके. ह.भ.प. पांडुरंग महाराज लोमटे, राजेंद्र महाराज शास्त्री, गणेश खराडे, धंनजय जोशी, ‍ह.भ.प. आसुरडेकर, महाराज दत्ता चव्हान, ज्ञानेश्वर मुळे,प्राचार्य पडवळ सर आदि मान्यवर उपस्थित होते.

 
Top