तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :

येथील नगर परिषद मार्फत शुक्रवार दि. ७  रोजी शहरातील भवानी रोडवरील भागात अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. येथील भवानी रोडवरील भागात सर्रास टु व्हीलर गाड्या मोठ्या प्रमाणावर रोड शहरातील, नागरीकासह, देवी भक्त कोठेही टु व्हीलर गाड्या राजरोशपणे लावत असल्याने याचा फटका मंदीराच्या मार्गावर दर्शनासाठी जाणाऱ्या देवी भक्ताना बसत असल्याने व तसेच भवानी रोडवरील भागात छोटे व्यापारी आपले दुकाने चक्क रोडवर लावत असल्याने दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती. शहरात टु व्हीलर गाड्यांना पार्गींग नसल्याने राजरोश पणे आपली वाहने कोठेही लावत असल्याने शहरातील भवानी रोड वरील भागात सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या पादचारी भाविकांना मोठा ञास सहन करावा लागत असल्यामुळे न.प.मार्फत च्या विशेष पथका मार्फत मोहिम राबविण्यात आली. शहरात  रस्त्यावर  ठिक ठिकाणी लावलेल्या टु व्हीलवर गाड्या न.प.कर्मचारी वर्गानी न.प.गाडीत घालुन तुळजापुर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या.

 या पकडलेल्या गाड्या तुळजापुर पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

टु व्हिलर गाड्यांना पार्कींग व्यवस्था  होणे गरजेचे! 

टु व्हीलवर गाड्याच्या मालकांना शिस्त लावण्याची गरज पोलीसांची.या रोडवर सतत टु व्हीलर गाड्यावर मोठ्या प्रमाणावर वारंवार गर्दी होते त्यांमुळे न.प.मार्फत टु व्हीलर गाड्याची पार्कींग व्यवस्था होणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासन ही या पुढे टु व्हीलर गाड्याच्यां मालकावर कडक कारवाई करुन दंडात्मक कारवाई करावी म्हणजे तुळजापुर कराना शिस्तीचा बडगा पोलीसांनी दाखवावा, अशी मागणी होत आहे.
 
Top