उस्मानाबाद (मन्सुर सय्यद) :-
येथील मध्यवर्ती बस स्थानकात मासिक पास काढण्यासाठी दूर खेड्याहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभारावे लागत आहे. विद्यार्थी सकाळी 8 वाजेपासून रांगेत उभारून पास काढण्यासाठी लागणारा फार्म मागतो तर कर्मचारी 2 वाजता या म्हणतात आणि 2 वाजता आल्यानंतर उद्या 10 वाजता या म्हणतात अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थिनीनी विचारले कि, असे का साहेब द्याना फॉर्म तर जा देत नाही असे म्हणून हाकलून लावत असल्याचा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.