तुळजापूर (दास पाटील) :-
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डाॅ.संजय कोरेकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते याच महाविद्यालयात सलग १८ वर्षे उपप्राचार्य पदावर कार्यरत होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. मोहिते सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त पदावर विद्यापीठाच्या तज्ञ समितीने डाॅ. संजय लिंबराज कोरेकर यांची प्राचार्यपदावर निवड केली. ते वरिष्ठ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे ते विभागप्रमुख आहेत. २७ वर्षांपासून ते याच महाविद्यालयात ज्ञानर्जनाचे काम करीत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, सचिव उल्हासराव बोरगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मान्यवरांच्या हस्ते डाॅ.संजय कोरेकर यांचा सत्कार करण्यात आला.