लोहारा (इकबाल मुल्ला) :
लोहारा तालुक्यातील जेवळी हायस्कुल येथील सहशिक्षीका तथा आलुर येथील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सौ. सुषमा प्रकाश तोळणुरे यांना डॉ. कलाम रिचर्स इन्सायर अवाॅर्ड पुरस्कार नुकताच देण्यात आला.
या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जुळे सोलापुर येथील प्रा.ए.डी.सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसुधारक बिजमोहन फोफालिया होते. तर प्रमुख म्हणुन सोलापुर विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ.मृणालीनी फडणवीस, जि.
प.चे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, सहा.आयुक्त सारीका भरले दुधनीकर, प्रा.चंद्रकांत चव्हाण, प्रा.जि.
के.देशमुख, मनोहर नारायणकर, कमांडर कैलासपती गिरवलकर, सुभेदार बाबुराव पेठकर आदी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु सौ.मृणालिनी यांच्या हस्ते सौ.सुषमा प्रकाश तोऴणूरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या सहशिक्षीका दरवर्षी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करतात. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होवुन उत्कृष्ट कार्य करतात, अशा विविध माध्यमातुन मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करीत असतात. या कार्याची दखल घेवुन यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
या सहशिक्षिकेचे उस्मानाबाद जिल्ह्यातुन व उमरगा-लोहारा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.