तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

अधिक मास चालू असल्यामुळे राज्यासह परराज्यातुन श्री क्षेत्र तुळजापुरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य कोरोनाचा तुळजापुरात वाढता पादुर्भाव लक्षात घेता तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वार समोर गर्दी होत असल्यामुळे महसुल व न.प. प्रशासनाच्या वतीने बुधवारी (दि. २३) सायंकाळी पासुन आर्यचौक व सुर्वणेश्वर मंदीराजवळ बॅरेकेटस लावण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक  तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदीराकडे प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे भाविक आता २५० ते ३०० फुट आर्य चौक, भवानी रोडवरील सुर्वणेश्वर मंदीराजवळ उभे राहुन हात जोडुन महाद्वाराचे दर्शन घेऊन जात आहेत. 

राज्य सरकारने ई-पास ची अट रद्द करत एस.टी. वाहतुक सेवाना परवानगी दिल्याने तुळजापुरात श्री देवी दर्शनासाठी गर्दी होत चालली होती. माञ प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून लांब अंतरावर बँरेकेटस लावण्यात आले आहेत. तसेच सध्या आधिक मास चालु असल्यामुळे भाविकांची वर्दळ चालु आहे. भाविकांना माञ आता लांब उभे राहूनच दर्शन घ्यावे लागत आहे. यापुर्वी राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महाद्वार बाहेरुन श्री देवीचे कळस दर्शन घेतल्याने भाविकांना समाधान प्राप्त होत होते. त्यामुळे आता लांब उभे राहुनच दर्शन घ्यावे लागत आहेत.

 
Top