नळदुर्ग दि.२६ :  येथील बोरी धरणात  नव्याने पाणी आल्याने या जलाशयाचे जलपूजन शनिवार दि.२६ सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरातील  युवकानी केले. 

नळदुर्ग येथे व बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यापासुन सतत  समाधानकारक पाऊस झाल्याने बोरी धरण भरले तुंडूब भरले  आहे. माञ  धरण भरले असले तरी आद्यप सांडवे चालु झाले नाही. याच धरणातुन श्री क्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा केला जातो.

 नळदुर्ग नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. सुमन दिलीप जाधव यांच्या वतीने  बोरी धरणातील नवीन जलाशयाचे पूजन करण्यात आले. नळदुर्ग शहरातील पिण्याच्या  पाण्याचे व  परिसरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटल्यामुळे सर्वञ समाधान व्यक्त केले जात आहे. धरणातील नवीन  पाण्याचे पूजा  करताना नवल जाधव, गणेश मोरडे , सुनील गव्हाणे,प्रवीण चव्हाण, मारुती घोडके,रणजित डुकरे,अमित शेंडगे,सचिन भोई आदि जणानी पुढाकार घेतले.

 
Top