तुळजापूर, दि. 06 : तुळजापूर तालुक्यातील डिकमल पारधी वस्ती येथे राहणारा चिवचिव्या जयराम भोसले उर्फ सागर, वय 21 वर्षे हा चोरीची मोटारसायकल वापरत आहे. अशी गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 05.09.2020 रोजी डिकमल पारधी वस्ती येथुन नमूद आरोपीस ताब्यात घेउन त्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल बाबत खात्री केली असता ती वाशी पो.ठा. हद्दीतून चोरीस गेलेली असुन त्या संबंधाने गु.र.क्र. 208 / 2020 नोंदलेला असल्याचे समजले. यावर पथकाने ती मो.सा. जप्त करुन आरोपीस वाशी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
