तुळजापुर : कुमार नाईकवाडी

संसर्गजन्य कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता मृत्यू दर कमी करण्यासाठी "माझे कुंटुब माझी जवाबदारी" ही मोहीम कोरोना मुक्त तुळजापुर शहरासाठी राबविण्यात येणार आहे. ही अभियान यशस्वी करण्यासाठी तुळजापुर न.प. चे कर्मचारी दि. १५ संप्टेबर पासुन घरोघरी भेटी देत असुन त्यासाठी एकुण १२ पथके तैनात करण्यात आली आहेत. सदरील पथकामार्फत प्रत्येक नागरीकांची थर्मा मिटर, आँक्सी मिटर द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. सदर मोहिमेदरम्यान कोणत्याही नागरीकास वैद्यकिय उपचाराची आवश्यकता भासल्यास तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले जाणार असुन या पथकावर उपजिल्हा रुग्नालयातील वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रण राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे.          

तुळजापुर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी न.प. मार्फत विविध उपाय योजना करण्यात येत असल्या तरी कोरोना रुग्नाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे सदर रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. २३ ते ३० सप्टेंब या कालावधीमध्ये जनता कर्फ्यु लागु करण्याचा निर्णय दि. २० रोजी उपविभागीय आधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलीस आधिकारी दिलीप टिपरसे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक चंचला बोडके, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व न.प.सदस्य यांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

"माझे कुंटुब माझी जवाबदारी" ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जनता कर्फ्यु लागु केलेला असल्यामुळे सदर कालावधीमध्ये आपआपल्या कुंटुबातील सर्व सदस्याची तपासणी करुन घेऊन कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव संपविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच जनता कर्फ्यु कालावधी मध्ये वैद्यकीय व्यावसायीकांची दुकाने २४ तास सुरु राहतील. तसेच दुध विक्रेते यांना ९ ते ११ या कालावधी मध्ये फिरुन दुध विक्री करण्यास परवानगी राहील. इतर सर्व प्रकारच्या शहरातील व्यावसायिक आस्थापना बंद राहील. सदर जनता कर्फ्यु यशस्वी करावा व कोरोनाचा वाढता प्रसार थांबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे जनतेला केले आहे.


 
Top