✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 5 ऑक्टोबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत निविदा काढण्याचे आदेश; उस्मानाबाद जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक व्ही.बी. चांडक यांची माहिती...
तुळजापूर : कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरु; यंदा भाविकांना नवरात्रोत्सव पार पडणार, महाद्वारावर विद्युत रोषणाईच्या कामास सुरुवात...
उस्मानाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे उस्मानाबादेत निर्दशने करण्यात आली...
उस्मानाबाद : सहा महिन्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट झाले सुरु, 50 टक्के आसनक्षमता बंधनकारक
उस्मानाबाद : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी करीता केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात नाफेड खरेदी केंद्र सुरु....
कळंब : तालुक्यातील शेलगाव (दि) येथील एका 55 वर्षीय महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मुलाच्या शिक्षण खर्च भागविणे कठीण झाल्याने घेतला टोकाचा निर्णय...
उस्मानाबाद : मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना मुस्लीम समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले..
उस्मानाबाद : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात बुधवारी उस्मानाबादेत राज्याची सिंहावलोकन बैठक....
उस्मानाबाद : येथील के.टी. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील एनआयपीईआर परीक्षेत यश...
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या तीन आठवड्यांपासून घट; मात्र केरळ, छत्तीसगडमधील रुग्णांचं प्रमाण वाढलं..
मुंबई : केंद्राच्या कृषी विधेयकाबाबत राज्यातील शेतकरी संघटनांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार, आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ उपसमिती आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार...
सोलापुर : तांदुळवाडीजवळ 400 किलो गांजा जप्त; पुणे कस्टमची कारवाई...
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात बनावट नोटांची छपाई होत असल्याचे उघड, बनावट नोटा, प्रिंटर, कागदाचा गठ्ठा कुरुंदवाड पोलिसांकडून जप्त, 3 अटकेत, बनावट नोटांचं कर्नाटक कनेक्शन उघड...
श्रीनगर : नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुभेदार सुखदेव सिंग यांना वीरमरण...
लेह लडाखपासून 174 किलोमीटर अंतरावर 5.1 रिश्टर स्केलचा भूकंप...
-----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
