मुरूम, दि. ३ :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. २) रोजी परिसर स्वच्छता उपक्रम साजरा करण्यात आला.

 प्रारंभी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.महेश मोटे, डॉ.अरुण बावा, प्रा.प्रतापसिंग राजपूत, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.संध्या डांगे, डॉ.शिला स्वामी, डॉ.विलास खडके, डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ. अविनाश मुळे आदिंनी पुढाकार घेऊन फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून परिसर स्वच्छ केला.

 
Top