चंद्रकांत हगलगुंडे यांना गरुड फाउंडेशनचा,
राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

तुळजापूर दि.22 :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे यांना गरुड फाउंडेशन राहुरी जिल्हा अहिल्या नगर यांचा यंदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेल्या 30 वर्षापासून शैक्षणिक सामाजिक व विविध क्षेत्रात लेखणीच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली असून, ग्रामीण भागात सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य सन्मान गरुड फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा खा. निलेश लंके, माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भांड, संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवार, विजय अमोलीक, संजय ठेंगे, डॉ साताप्पा खरवडे, गरुड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आकाश पुजारी, रामकृष्ण भोसले, शेखर चोरगे यांच्या उपस्थितीत 7 जून रोजी डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृह राहुरी येथे वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याचे गरुड फाउंडेशनचें संयोजक रमेश खेमनर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
 
Top