सांगोला :- सध्यस्थितीत सांगोला तालुक्यावर दुष्काळी परिस्थितीत पाण्याची साठवणूक करण्यासाठी शिवसेना सांगोल्याच्या वतीने मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी 1000 लीटर्स क्षमतेच्या 101 पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे यांनी दिली. 
         शिवसेनेच्यावतीने टाक्या वाटप करण्यासाठी व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला उपजिल्हा प्रयुख सूर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरूद्दीन खतीब, उपतालुका प्रमुख अरविंद पाटील, नेताजी इंगोले, गणेश घाडगे, भारत मोटे, विभागप्रयुख नवल गाडे, सूर्यकांत बाबर, घेरडीचे गटनेते आप्पासाहेब सरगर, युवा सेनेचे सदानंद पांढरे, सताधान चव्हाण, सचिन वाघयारे, राजू मोरे, तुषार इंगळे, तानाजी गोडसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाक्या वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी जिल्ह्याचे उपसंपर्कप्रयुख पुरूषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, लक्ष्मीकांत ढोंगे-पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, उत्तम प्रकाश खंदारे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, मंगळवेढा तालुका प्रमुख येताळा भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत जयभवानी चौक सांगोला येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सांगोला तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी केले आहे.
 
Top