बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: राज्‍यस्‍तरीय दुसरी ग्रामीण होमिओपॅथीक परिषद दि. 21 एप्रिल रोजी बार्शीतील यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक सभागृह येथे होत आहे. राज्‍यातील सुमारे दीडशे डॉक्‍टर्स वैद्यकीय सोयी व उपयोगाबाबत चर्चा करणार आहेत.
        या परिषदेसाठी सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. लक्ष्‍मणराव ढोबळे, विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, सोलापूर जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा डॉ. निशिगंधा माळी, डॉ. अरुण भस्‍मे, डॉ. अरुण जाधव, डॉ. रविंद्र भोसले, डॉ. गिरीश दारुळे, डॉ. बी.वाय.यादव, डॉ. कालिदास लिमकर, डॉ. हरी घोलप आदी मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.
 
Top