सोलापूर :- राज्याचे गृह मंत्री ना. आर. आर. पाटील हे दि. 19  एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे
       शुक्रवार दि. 19 एप्रिल 2013 रोजी दुपारी 4 वाजता सांगली येथून शासकीय वाहनाने वाटंबरे ता. सांगोला येथे आगमन व ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळी भागास चारा वाटप समारंभास उपस्थिती. दुपारी 4.45 वाजता वाटंबरे ता. सांगोला येथून शासकीय वाहनाने सांगोलाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता सांगोला येथे दै. सांगोला नगरी वृत्तपत्राच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय मोटारीने तासगांव जि. सांगलीकडे प्रयाण करतील.
 
Top