मुंबई -: सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित पंचविसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे अंतिम फेरीचे निकाल जाहीर झाले असून रंगमंच, मुंबई या संस्थेच्या 'प्रपोजल' या नाटकास 5 लाख रु.चे प्रथम पारितोषिक मिळाले. अश्वमी थिएटर्स व अद्वैत थिएटर्स या संस्थेच्या ­      'टॉम आणि जेरी' या नाटकास 3 लाख रु.चे द्वितीय पारितोषिक आणि आशय प्रॉडक्शन या संस्थेच्या 'सुखान्त' या नाटकास 2 लाख  रु. चे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यानी अभिनंदन केले आहे.
     दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (75,000 रु.) राजन ताम्हाणे (नाटक-प्रपोजल), द्वितीय पारितोषिक (50,000 रु.) मंगेश कदम (नाटक-लहानपण देगा देवा), तृतीय पारितोषिक (25,000 रु.) निखील रत्नपारखी (नाटक-टॉम आणि जेरी)
     नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (50,000 रु.) रत्नाकर मतकरी (नाटक-सुखान्त), द्वितीय पारितोषिक (30,000 रु.) बाळ कोल्हटकर (नाटक-लहानपण देगा देवा), तृतीय पारितोषिक (20,000 रु.) सुरेश चिखले (नाटक-प्रपोजल)
     प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (20,000 रु.) प्रदीप मुळे (नाटक-प्रपोजल), द्वितीय पारितोषिक (15,000 रु.) शितल तळपदे (नाटक-टॉम आणि जेरी), तृतीय पारितोषिक (10,000 रु.) राजन ताम्हाणे (नाटक-एका क्षणात)
     नेपथ्य : प्रथम पारितोषिक (20,000 रु.) प्रदीप मुळे (नाटक-प्रपोजल), द्वितीय पारितोषिक (15,000 रु.) प्रसाद वालावलकर (नाटक-सगळे उभे आहेत), तृतीय पारितोषिक (10,000 रु.) राजन भिसे (नाटक-फॅमिली ड्रामा)
     संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (20,000 रु.) राहुल रानडे (नाटक-प्रपोजल), द्वितीय पारितोषिक (15,000 रु.) मिलिंद जोशी (नाटक-टॉम आणि जेरी), तृतीय पारितोषिक (10,000 रु.) अशोक पत्की (नाटक-एका क्षणात)
     वेशभूषा : प्रथम पारितोषिक (20,000 रु.) गीता गोडबोले (नाटक-प्रपोजल), द्वितीय पारितोषिक (15,000 रु.) महेश शेरला (नाटक-लहानपण देगा देवा), तृतीय पारितोषिक (10,000 रु.) अमिता खोपकर (नाटक-मायलेकी)
     रंगभूषा : प्रथम पारितोषिक (20,000 रु.) सचिन जाधव (नाटक-मायलेकी), द्वितीय पारितोषिक (15,000 रु.) शरद सावंत (नाटक-प्रपोजल), तृतीय पारितोषिक (10,000 रु.) महेंद्र झगडे (नाटक-लहानपण देगा देवा)
     उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक व 25,000 रु.चे पारितोषिक पुरुष कलाकार : मोहन जोशी (नाटक-सुखान्त), मंगेश कदम (नाटक-लहानपण देगा देवा), डॉ.अमोल कोल्हे  (नाटक-प्रपोजल), प्रसाद ओक (नाटक-बेचकी), निखिल रत्नपारखी (नाटक-टॉम आणि जेरी) यांना तर स्त्री कलाकार : आदिती सारंगधर (नाटक-प्रपोजल), नेहा जोशी (नाटक-बेचकी), नंदिता धुरी (नाटक-सुखान्त)  कादंबरी कदम (नाटक-टॉम आणि जेरी), सुकन्या कुलकर्णी (नाटक-फॅमिली ड्रामा) यांना प्राप्त झाले आहे.
    दि. 3 ते  10 एप्रिल 2013 या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.विश्वास मेहेंदळे, मदन गडकरी, श्रीमती फैयाज, राजन शंकर बने, श्रीमती आदिती देशपांडे यांनी काम पाहिले, असे संचालक, सांस्कृतिक कार्य अशुतोष घोरपडे यांनी कळविले आहे.
 
Top