बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नोकरी करीत असताना वाईट प्रवृत्‍तींविरुध्‍द लढा देताना कौतुक करत मनोधैर्य वाढविण्‍याचे काम सर्व मिडियाने केले असून मी एकटी नाही, याची जाणीव झली आणि आणखीन आत्‍मविश्‍वास वाढला असल्‍याचे मत दक्षिण सोलापूरच्‍या तहसिलदार सौ. शिल्‍पा ठोकडे यांनी व्‍यक्‍त केले.
     बार्शी तालुका सेवानिवृत्‍त संस्‍था व पत्रकार मंडळाच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. उत्‍तरेश्‍वर मंदिरातील सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्‍यापारी महासंघाचे उपाध्‍यक्ष बाबासाहेब कथले, डॉ. नानासाहेब सामनगावकर, मर्चंट असोसिएशनचे अध्‍यक्ष किशोरभाई शहा, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे दिलीप गांधी, विश्‍वेश्‍वर सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार होनराव, उत्रेश्‍वर देवस्‍थानचे सरपंच दिनेशसिंह परदेशी, भारतीय जैन संघटनेचे ओमप्रकाश बाफणा आदी मान्‍यवर उपस्थित होते.
     पुढे बोलताना सौ. ठोकडे म्‍हणाल्‍या, बेकायदा वाळू उपसा करणा-या गूंड प्रवृत्‍तीविरूध्‍द लढताना अनेक वेळा जीवावर बेतले, परंतु तुमच्‍या सारख्‍या लोकांच्‍या चांगल्‍या आशिर्वादाच्‍या बळावर संकटे दूर गेली. कायम पुढे जताना कुठेतरी मागे वळून पहावे लागते, मी एकटी नाही, हे मला सतत जाणवते. कुर्डुवाडी आणि बार्शी हे मी वेगळे समजत नाही. सोलापूर जिल्‍ह्याचे पाणीच वेगळे असल्‍याने अनेक गुंडाशी मुकाबला करताना मला वेगळे अनुभव आले. पोलीस उपनिरीक्षक पदावर काम केले, त्‍यावेळी ड्रग्‍जचे अड्डे उध्‍वस्‍त केले. सोलापूर भागातील बोली भाषेत एक वेगळीच धार आहे. म्‍हणजेच सोलापूरी तडका याचा अनुभव कोल्‍हापूरकडे नोकरी करताना अनुभव आला. मला कवळ वाळॅ माफियांविरूद्ध काम करुन थांबायचे नाही तर यापुढे खडीचे साठे, शिधापत्रिका इत्‍यादी अनेक कामात सामान्‍य लोकांना न्‍याय मिळवून द्यायचा आहे.
    कार्यक्रमाच्‍या प्रारंभी भगवंताच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. एन.आर. कुलकर्णी यांनी अध्‍यक्षीय समारोप केला, कार्यक्रमाचे प्रास्‍ताबविक व्‍ही.बी. वांगी यांनी तर आभर गुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी उपाध्‍यक्ष व्‍ही.जी. लोखंडे, सल्‍लागार डी. आर. शेटे, आर.एस. म्‍हेत्रे, आर.डी. लिमकर, एस.एस. जाधव, होनमुटे, अँड. अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.
 
Top