नळदुर्ग -: सोलापूरहून उमरग्‍याकडे जाणा-या मोटारसायकस्‍वारास अज्ञात भरधाव वाहनाने जोराची धडक दिल्‍याने एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना सोलापूर-हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील मुर्टा (ता. तुळजापूर) पाटीजवळ बुधवारी रात्री नऊ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
    बालाजी हिरवे (वय 30) असे अपघातात ठार झालेल्‍याचे नाव आहे. तर चंद्रकात बनसोडे असे गंभीर जखमीचे नाव आहे. यातील बालाजी हिरवे व चंद्रकांत हे सोलापूर येथून मोटारसायकलवरुन (क्र. एमएच 25 जे 5104) उमरग्‍याकडे जात होते. दरम्‍यान त्‍यांची मोटारसायकल मुर्टा पाटीजवळ आली असता पाठीमागून अज्ञात वाहनाने त्‍यांना जोराची धडक दिली. यात बालाजी हिरवे हा जागीच ठार झाला तर चंद्रकात बनसोडे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
 
Top