सोलापूर :- महाराष्ट्र शासन, पर्यंटन व सांस्कृतिक कार्य विभागाने  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्री संगीत प्रोत्साहन ही नवीन योजना सुरु केलेली आहे.
    या योजनेंतर्गत 4 उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यापैकी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्री संगीत जीवन पुरस्कार अंतर्गत शास्त्रीय संगीतात (शास्त्रीय गायन व वादन) प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणा-या कलावंतास जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. पुरस्काराची रक्कम रु. 5.00 लाख इतकी असेल.
    सदर पुरस्कार सोहळा हा दरवर्षी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्री संगीत महोत्सवाच्या वेळेस आयोजित करण्यात येईल. सदर पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्यातील शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ व मान्यवर कलावंतांच्या नांवाच्या शिफारशी प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शासनास पाठविण्यात येणार आहे.
 
Top