पंढरपूर -: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या  अंतर्गत येणारी विविध विकास कामे येत्या आषाढी यात्रेपूर्वी संबधित ठेकेदारांनी पूर्ण करावीत असे निर्देश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिले.
    शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात प्रमुख  अधिका-यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, प्रांतधिकारी बाबासाहेब बेलदार, पंढरपूर न.पा.चे मुख्याधिकारी रविंद्र जाधव, क्रिएशन संस्थेचे मोहन साखळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय पाटील, म.रा.वि.म.चे राजाराम बुरुड आदी उपस्थित होते.
    विवेकवर्धनी ते  शिवाजी चौक, इंदीरा गांधी चौक ते सावरकर पुतळा, आंबेडकर पुतळा ते रक्त पेढी आदी मार्गांचे ठेकेदारांनी गुणवत्तापूर्व कामे करावीत. या झालेल्या  कामाचा अहवाल संबधितांनी प्रांतधिका-यांना द्यावा. तसेच नगरपरिषदेने या मार्गावरील अतिक्रमणे काढावीत असे आदेशही श्री.देशमुख यांनी दिले.
    या आढावा बैठकीमध्ये शहरातील रस्ते, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छता, विद्युतीकरण,पाणी पुरवठा, पुल-घाट बांधकाम, पालखी तळ सुविधा तसेच पंढरपूर रस्ते दुरुस्ती आराखडा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.    
         या आढावा बैठकीसाठी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
 
Top