उस्मानाबाद :- येडशी येथील अभयारण्यात पॅगोडाचे लाकडी शिडीला पोलीसांना एक अनोळखी इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार त्याचे वय अंदाजे 30 वर्षे, उंची-169 से.मी, चेहरा-गोल, केसाची ठेवण-बारीक साधी कट, शरीराचाबांधा- सडपातळ, वर्ण-काळा सावळा, अंगावर लाल रंगाचा शर्ट, अंगात काळी पँन्ट, पायात काळया रंगाची चप्पल, उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे नाव गोंदलेले अशा वर्णनाचा बेवारस इसम मृत आढळून  आला आहे.  याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे (ग्रामीण) उस्मानाबाद यांचेशी  संपर्क साधावा.
 
Top