उस्‍मानाबाद -: श्री सिध्‍दीविनायक मल्‍टीस्‍टेट को.ऑप. केडीट सोसायटी लि., उस्‍मानाबाद या संस्‍थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्‍थापक दत्‍ता कुलकर्णी यांच्‍या उपस्थितीमध्‍ये संपन्‍न झाली. सर्वप्रथम सभेच्‍या सुरुवातीस काळीण दुर्घटनेतील मृतांना श्रध्‍दांजली अर्पण करुन सभेच्‍या कामकाजास सुरुवात करण्‍यात आली. आगामी कालावधीत संस्‍था विमा व कृषी क्षेत्रामध्‍ये कार्य करण्‍याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्‍यात आला.  
     संस्‍था आगामी कालावधीमध्‍ये स्‍वताःचे डाटा स्‍टोअर सेंटर उभारणार असून संस्‍थेच्‍यावतीने चालू वर्षामध्‍ये वेअर हाऊस उभारण्‍या यावे व त्‍यामधील माल तारणावर सभासदांना कर्ज वाटप करण्‍यात यावे, असा ठराव संमत करण्‍यात आला.
     यावेळी संस्‍थेचे संस्‍थापक दत्‍ता कुलकर्णी, बालाजी कोरे, राजेश घुटे, संतोष जहागिरदार, अॅड. सचिन मिनियार, प्रवीण पाठक, अभिजीत पाटील, जिवन वाठवडे, बालाजी जाधव, संजय बारकुल, राजेश पौळ यांच्‍यासह संस्‍थेचे सभासद उपस्थित होते.
 
Top