बार्शी - येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नूतन चौदा शाखांची स्थापना करण्यात आली. नूतन शहराध्यक्ष शंकर  वाघमारे यांची नुकतीच निवड झाल्यानंतर बार्शीतील विविध ठिकाणी शाखांची स्थापना करण्यात आली आहे.
    यावेळी विविध सामाजिक प्रश्‍नांसाठी शहरातून मोर्चा काढून तहसिलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. उपाध्यक्ष राहूलभैय्या बोकेफोडे, दयावान कदम, अभिमान थोरात, नितीन मस्के, प्रमोद शिंदे, सोमा बोकेफोडे, विशाल बोकेफोडे, सूरज कांबळे, विनोद लंकेश्वर, प्रविण गायकवाड, अजय वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.   
    बार्शीतील भीमनगर, लोकमान्य चाळ, ४२२ ख्वाजा गरिब नवाज नगर, रमामाता नक्षर, बेलदार गल्ली, रमाई चौक, भिमाई चौक, जैन मंदिर, ज्ञानेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे नगर, जयभिम नगर, राजन मिल, सिध्दार्थ नगर, सोलापूर रोड आदी ठिकाणी या शाखांची स्थापना करुन फलक लावण्यात आले. बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दलितांवरील अन्यायाची दखल घ्यावी, शिष्यवृत्तीत वाढ, रमाई घरकुल योजनेतील जाचक अटी शिथील कराव्या, गारपीठग्रस्तांचे अनुदान वाटप करावे आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार पवार यांच्याकडे देण्यात आले.
 
Top