नळदुर्ग -  सामाजिक परिवर्तनाची परिभाषा शिकविणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेड‍कर यांच्‍या विचाराशिवाय समग्र परिवर्तनाची चळवळ यशस्‍वी होणार नाही, म्‍हणूनच साहित्‍य सम्राट लोकशाहीर आण्‍णा भाऊसाठे यांनी 'जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भिमराव' असे सांगितल्‍याचे  परिवर्तन सामाजिक संस्‍थचे सचिव मारूती बनसोडे, यांनी गुजनूर ता. तुळजापूर येथे बोलताना सांगितले.
   साहित्‍यरत्‍न आण्‍णाभाऊ साठे जयंती उत्‍सव मंडळ गुजनूरच्‍या वतीने आण्‍णाभाऊ साठे यांच्‍या जयंती निमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेतील विजेत्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना बक्षीस वितरण व व्‍याख्‍यानाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार रोजी करण्‍यात आले होते.यावेळी  पूढे बोलताना बनसोडे म्‍हणाले की, बहुजनांतील महामानवाचे विचार हे अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहेत. तेव्‍हा महामानवांना जाती जातीत बंदिस्‍त ठेवू नका. त्‍यांचे विचार आचरणात आणण्‍याच्‍या प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करावा.
   यावेळी प्रमुख पाहूणे म्‍हणून रिपाईचे तालुकाध्‍यक्ष एस.के गायकवाड, आर.एस गायकवाड, दयानंद काळुंके, लहुजी शक्‍ती सेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष शिवाजी गायकवाड, सोमनाथ बनसोडे, शिरीष डुकरे आदी उपस्थितीत होते.  या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पोलिस पाटील किशोर वाघमारे, कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचलन महादेव मोरे यांनी केले. यावेळी सरपंच आण्‍णाराव मुलगे, उपसरपंच संतोष पाटील, इजाप्‍पा वाघमारे, जयवंत वाघमारे, संजय मोटे, दयानंद मोरे यांसह ग्रामस्‍थ उपस्थित होते.शेवटी भव्‍य मिरवणूकीने जयंतीची उत्‍सहात सांगता करण्‍यात आली.
 
Top