वैराग (महेश पन्‍हाळे)  वेळ सकाळी नऊची होती, दहशतवादी  गावात आलेत, तीन ठिकाणी बॉम्‍ब आढळले,श्‍वानपथकाच्‍या पाठीमागे बंदुकधारी जवान धावत होते, गजबजलेल्‍या ठिकाणी मोठी धावपळ, गावात आता मोठी घटना घडणार.... अशा अनेक तर्क - वितर्कानी   चर्चेला उधाण आले होते.
    प्रसंग मात्र होता. दहशतवाद विरोधी पथकाने सादर केलेल्‍या प्रत्‍यक्ष प्रथम प्रात्‍याक्षिकाचा जम्‍मू - काश्‍मीर, मुंबई,दिल्‍ली सारख्‍या शहरात  दहशतवादी घटना घडत आहेत. यामध्‍ये सर्वसामान्‍य जनता मात्र बळी पडत आहे. या मेट्रोसिटीजमधील दहशतवादांचे कनेक्‍शन ग्रामीण भागतही पसरल्‍याचे यापूर्वीच्‍या अनेक तपासांमध्‍ये उघड झाले आहे. या दहशतवादाविरोधात शहरी जनतेसोबत ग्रामीण जनतेमध्‍ये जनजागृती होणे ही काळाची गरज  आहे. त्‍यासाठी सोलापूर दहशतवादी विरोधी पथकाने वाढत्‍या पुढील कारवाया टाळण्‍यासाठी श्‍वानपथक बॉम्‍बशोधकपथक , राखीव पोलीस दल व वैराग पोलीस कर्मचा-यानी वैराग येथे गजबजलेल्‍या ठिकाणी प्रात्‍यक्षिक केले. अनोळखी व्‍यक्‍ती, संशयास्‍पद हालचाली, बेवारस वस्‍तू, अफवा पसरवणा-या घटकांपासून सावधगिरीने उपाय म्‍हणून सर्वसामान्‍य जनतेने त्‍वरीत पोलीस प्रशासनांकडे संपर्क साधण्‍याविषयी मार्गदर्शन करण्‍यात आले. वैराग येथे मागील काही घटना - पाहता हे प्रात्‍यक्षिक सर्वसामान्‍य नागरिकांसाठी प्रथम दाखविण्‍यात आल्‍याचे  सपोनि उमाकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी सपोनि हर्षल एकरे ,सोलापूर दहशतवाद पथकाचे सपोनि एस.टी उन्‍हाळे, बॉम्‍बेशोधक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बावळे, राज्‍य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक चंदनशिवे, हवलदार  अनुरत देशमूख, अविनाश जाधव, सचिनदादा दंगाकाबू पथकाचे जवान पोलीस कर्मचारी व वैराग व भागातील नागरिक, व्‍यापारी, वाहनधारक, मोबाईल सिम विक्रते,  विद्यार्थी यावेळी  उपस्थित होते.
 
Top