उस्मानाबाद - सध्या सोयाबिन-कापूस या पिकावर कांही ठिकाणी चक्री मुंगा, उंटअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोप्टेरा, घाटे अळी हेलिकोव्हर्पाचा प्रार्दुभाव व कापूस पिकावर रसशोषण करणा-या कीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कीडीच्या नियंत्रणासाठी शेतक-यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृ‍षि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    कापूस पिकावरील रसशोषण करणा-या कीडीच्या नियंत्रणासाठी फीप्रोनिल 5 एस सी 2 मिली किवा असिटामिप्रिड 20 एस पी 0.2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, पावर पंपासाठी किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी.    सोयाबिन पिकावरील उंट अळी, तंबाकुवरील पाने खाणारी अळी  (स्पोडोप्टेरो), घाटे अळी, (हेलिकोव्हर्पाच्या) नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5 एस जी  0.4 ग्राम प्रती लिटर  पाण्यात मिसळून फवारावे. चक्री मुंग्याच्या व्यवस्थापनासाठी इथोफेनप्रोक्स 10 इ सी 5.2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.           
 
Top