नळदुर्ग - गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर 1 सप्‍टेंबर रोजी पोलीस उपाधीक्षक मोहन विधाते यांच्‍या नेतृत्‍वाखाली नळदुर्ग शहरात पोलीसांनी मिरवणूक मार्ग  तसेच इतर महत्‍वाच्‍या रस्‍त्‍यावरून पथ संचलन केले.
    गणेशोत्‍सव शांततेत पार पाडावा गणेशोत्‍सव कालावधीत शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1 सप्‍टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नळदुर्ग शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग तसेच इतर मुख्‍य रस्‍त्‍यावरून पोलीसांनी पथसंचलन केले. या पथसंचलाचे नेतृत्‍व पोलीस उपधीक्षक मोहन विधाते यांनी केले. या पथसंचलनात नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.वाय डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे, पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्‍यासह 50 पोलीस कर्मचारी, 35 गृहरक्षक दलाचे जवान, राज्‍य राखीव पोलीस दलाचे दोन सेक्‍शन आदींचा सहभाग होता. या पथसंचलनामुळेच शहरातील गुन्‍‍हेगारी प्रवृत्‍तीच्‍या लोकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले होते.  
 
Top