पांगरी - 'शिक्षक दिना'ची संधि साधून हा दिवस 'वृक्षारोपण दिन'म्हणून साजरा करण्याच्या शासनाच्या आदेशाला  पांगरीसह बार्शी तालुक्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला  असून 5 सप्टेंबर शुक्रवारी या एकाच दिवशी पांगरी,उपळाई-ठोंगे,आगळगाव,उकडगाव,घोळवेवाडी,चिंचोली,पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतिणी विविध जातीच्या हजारो वृक्षांची त्या-त्या गावच्या मान्यवरांच्या हस्ते व शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लागवड करण्यात आली.
     वृक्ष लागवड व  सवर्धन ही काळाची गरज असून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळून आपल्याला दुष्काळासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असून वृक्षतोड थाबवून जमिनीची होणारी धूप रोखली पाहिजे असे प्रतिपादन बार्शी पंचायत समितीचे श्री.विष्णु कशाळे यांनी केले ते शिक्षण दिन व वृक्षारोपन दिंनांनीमित पांगरी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसह अंगणवाडी,ग्रामपंचायत कार्यालय आदी शासकीय ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सरपंच विजय गोडसे होते.यावेळी माजी सरपंच जयंत पाटील,पांगरीचे ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,केंदप्रमुख श्रीहरी गायकवाड,मारुति म्हसे-पाटील, माजी सरपंच संतोष शिंदे आदि हजर होते. उपळाई-ठोंगे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच विजय ठोंगे,पंचायत समिति सदस्य बाळासाहेब खराडे,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जामदार,जयवंत कदम,खंडू वैद्य,ग्रामसेवक राहुल गरड,यांच्या उपस्थितीत शासकीय निमशासकीय ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.शिक्षक,विध्यार्थी,ग्रामस्थ,अधिकारी आदींच्या सहभागातून वृक्षारोपन मोहीम राबवण्यात आली.            चिखर्डे,ममदापुर,चिंचोली,ऊक्कडगाव,घोळवेवाडी,झानपुर,चारे,घारी,कोरेगाव,शिराळे,पाथरी,वालवड,धामनगाव,आदि गावामध्येही शतकोटी वृक्ष लागवड या योजनेतून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली.
 
Top