नळदुर्ग - येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्‍याच्‍या गैरकारभाराविरोधात व कारखान्‍याला चांगले दिवस यावे, संचालक मंडळाला चांगली सदबुद्धी देवो व तालुक्‍यातील शेतक-यांना सुख समृद्धीचे दिवस यावेत यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष अमरराजे कदम यांच्‍या नेतृत्‍वाखाली सकाळी ठिक 11 वाजता तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग येथे कारखान्‍याच्‍या मुख्‍य गेट समोर महाआरतीचे आयोजन करण्‍यात आले आहे.
 यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, तालुकाध्‍यक्ष शाम माळी, नळदुर्ग शहराध्‍यक्ष ज्‍योतीबा येडगे, तुळजापूर शहराध्‍यक्ष राजाभाऊ मलबा, बशीर शेख्‍ा, एस.के जहागिरदार, महेश जाधव, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद कदम, सुरज कोटावळे, तानाजी खलाटे, अलीम शेख, रमेश घोडके, अरूण जाधव, गौस कुरेशी, दत्‍तात्रय धारवाडकर, शिवाजी चव्‍हाण, आदी उपस्थित राहणार आसल्‍याचे पत्रकाद्वारे अमरराजे कदम यानी  सांगितले आहे. 
                  पुढील विषयाच्‍या  विरोधात महाआरती   
कारखान्‍याची 429.25 एकर जमिनीच्‍या वापराचा व भाडेपट्टेचा आतापर्यंतचा हिशोब देण्‍यात यावा.सहकारी कायदा 1960 च्‍या कलम 83 नुसार कारखान्‍याच्‍या संपूर्ण गैरकारभाराची चौकाशी व्‍हावी.दि.24 डिसेंबर 1999 रोजीच्‍या कलम 83 नुसार झालेल्‍या चौकाशीतून कलम 88 नुसार जबाबदारी निश्चित झालेल्‍या व्‍यक्‍तीवर तात्‍काळ कारवाई व्‍हावी, कारखान्‍यातील उपयोगी वस्‍तू भंगारामध्‍ये विक्री करणा-या भंगार चोराविरोधात गुन्‍हा दाखल व्‍हावा.संचालक मंडळ, लोकमंगल उदयोग समूह, दृष्‍टी शुगर यांनी कारखान्‍यावरती 100 कोटींच्‍या पूढे कर्जाचा बोजा वाढवून कारखाना मोडकळीस आणला. या सर्व प्रकारची चौकाशी व्‍हावी असे नमुद केले आहे.
 
Top