पांगरी( गणेश गोडसे) पुणे-लातूर राज्यमार्गाची बार्शी- पांगरी दरम्यान अतिशय दयनीय अवस्था झाली असून वाहन चालकाना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत असून नादुरुस्त रस्त्यामुळे या मार्गावर छोटे-मोठे अपघात होऊ लागले असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रास्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा सोलापूर जिल्हा कोंगेस कमिटीच्या सरचिटणीस रूपाली नारकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाअधिकार्‍यांना दिला आहे.
     निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यमार्गावरील पांगरी ते बार्शी दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारवार विनंत्या अर्ज करूनही याची दखल सा.बा.विभाग बार्शी याच्या अधिकार्‍यानी घेतलेली नाही.पांगरी हा या या मार्गावरील वाहतुकीचा महत्वाचा टप्पा असून व्यापार,शिक्षण,नौकरी,दवाखाना आदि कारणामुळे या मार्गावर वाहनाची सतत रेलचेल असते.दैनंदिन कामासाठी पांगरीलील जनतेला बार्शीशी व या मार्गावरील इतर गावातील जनतेला पांगरीशी संपर्क ठेवावा लागतो.गत 5 वर्षात या रस्त्यावर दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा निधि खर्च करण्यात येऊनही दर वर्षी रास्ता नादुरुस्त होतोच.तरी सा.बा.विभागाणे याची तत्काल दखल घेऊन रस्ता दुरुस्त करून होणार्‍या दुर्घटना टाळाव्या अन्यथा रस्त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असे निवेदनात म्हटले आहे.
 निवेदनाच्या प्रती सा.बा.मंत्री छगन भूजबळ,पालकमंत्री दिलीप सोपल,मुख्य अभियंता सा.बा,उप अभियंता बार्शी यांना दिलेल्या आहेत.
 
Top