उस्‍मानाबाद -  प्रहार क्रांती आंदोलन संघटनेचे तालुक्‍यातील कनगरा येथे 29 शाखा गणेश विसर्जन दिनी स्‍थपना करण्‍यात आली. शाखेच उदघाटन पतंजली योग समितीचे जिल्‍हा समन्‍वयक तथा मराठी साहित्‍य परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन तावडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणून जेष्‍ठ साहित्यिक श्री. अत्रे, सिनेट सदस्‍य नितीन बागल, जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काकडे, संजय गांधी निरधार समितीचे तालुकाध्‍यक्ष लक्ष्‍मण सरडे, गावचे सरपंच मुन्‍ना इंगळे, महादेव इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नितीन तावडे यांनी भाषणात मयुर काकडे यांनी अपंगाच्‍या क्षेत्रात मोठा लढा उभा केला असून त्‍याचे काम अपंगासाठी उल्‍लेखनिय आहे. अपंग बांधवांनी त्‍याच्‍या पाठीशी खंबिरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष मयुर काकडे यांनी, अपंग संघटनेच्‍या जिल्‍ह्यात 29 शाखा स्‍थापन झाल्‍या असून ही ताकद माझ्या एकटयाची नसून संपूर्ण अपंग बांधवांची आहे. अपंगाच्‍या कल्‍याणासाठी शासन स्‍तरावर प्रयत्‍न करून अपंगांसाठी असलेल्‍या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी अपंग बांधवांना सहकार्य करेन, असे सांगितले. या कार्यक्रमात कनगरा येथे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. यावेळी शाखाध्‍यक्षपदी महादेव इंगळे यांच्‍यासह इतर अपंग बांधवांची शाखेची कार्यकारणी जाहीर करण्‍यात आली.
 
Top