पांगरी(गणेश गोडसे)  माथ्यापासुन पायथ्यापर्यंत साखळी पद्धतीच्या बंधा-यांनी पाणी अडवण्याचा  मानस असून त्यामुळे त्या त्या भागात पडलेले पावसाचे पाणी अडून शेतीला त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी येथे पाथरी-पांगरी पाणीपुरवठा योजना व चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलाव या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आयोजित मेळावा व राष्ट्रवादी कॉग्रेस संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्काराला ऊत्तर देताना बोलत होते.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण नाटकर होते.यावेळी व्यासपीठावर बार्शीचे नगराध्यक्ष रमेश पाटील,नागेश अक्कलकोटे,चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलाव कृती समितीचे अध्यक्ष कमलाकर पाटील,सचिव दिलीप शिंदे,तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड,विलास रेनके,शीतल जानराव,संतोष चव्हाण,कुंडलिक गायकवाड,लक्ष्मण खबाले,विक्रांत गरड,बाबा जाधव,मोहन घावटे,अमोल गुडे,मनीष चौहाण,स्वप्नील काळे,तात्या बोधे,नंदकुमार काशीद,किरण पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
 ना.सोपल पुढे बोलताना म्हणाले की पाथरी साठवण तलावाची ऊंची दोन फुटाणी वाढऊन या तलावाच्या परिसरातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.यावेळी पांगरिसह चिंचोली,ढेंबरेवाडी,पांढरी,घोळवेवाडी,येथील ग्रामस्थाकडूनही ना. सोपल यांचा सत्कार करण्यात आला.नंदकुमार काशीद,नागेश अक्कलकोटे,दिलीप शिंदे आदींची समायोचित भाषणे झाली.
 कार्यक्रमाच्या यशीस्वीतेसाठी संतोष चव्हाण,दत्ता पोफळे,नीलकंठ शेळके,बिभिशन गोडसे,सुनील गाढवे,अल्लामीन शेख,सतीश घावटे,मनोज मोरे,अजय पोफळे,शाहजान बागवान,अजित वासकर आदींनी परिश्रम घेतले.
 
Top