उस्‍मानाबाद - किरकोळ कारणावरून उस्‍मानाबाद येथे एकास पोलिस असल्‍याचे सांगुन मारहाण झाल्‍याच्‍या घटनेचा महाराष्‍ट्र पँथर कमिटीच्‍या वतीने जाहिर निषेध करून याप्रकरणी कारवाई करण्‍याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे करण्‍यात आली आहे
    उस्‍मानाबाद  शहरातील मराठवाडा चालक मालक (जीप - कार) संघनेचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष सतिश ओव्‍हाळ हे दि. 31 ऑगस्‍ट रोजी 5 वाजण्‍याच्‍या सुमारास आपली कार शिवाजी चौकामधील पार्किंग पॉईंटमध्‍ये गाडी लावून बसले असता काही युवक तेथे लघू शंका करण्‍यास आले. यावेळी ओव्‍हाळ यांनी त्‍यांना हा लघूशंकेची जागा नसून जीप कार पॉईंट आहे. असे म्‍हणत त्‍यांना थांबवले . त्‍यानी ओव्‍हाळ यांना आम्‍ही कोण आहोत तुला माहित नाही का, आम्‍ही पोलीस आहेत असे सांगुन  मारहाण केली. ओव्‍हाळ हे जखमी झाले असुन रूगणालयात उपचार घेत आहे.
       पोलीस प्रशासनाच्‍या नावाचा गैरवापर करून गुंडागर्दी करणा-याचां  महाराष्‍ट्र पँथर कमिटीच्‍या वतीने जाहिर निषेध करून  शिवाजी चौक येथील मोटार पार्किंग मध्‍ये गाडी लावून रोजी रोटीची वाट बघणा-या युवकावर पुन्‍हा असा अन्‍याय होवू नये व ओव्‍हाळ यांना मारहाण करणा-यांना अटक करून त्‍याच्‍यावर कायदेशीर कार्यवाही करावी अन्‍यथा पँथरच्‍यावतीने जिल्‍हाधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्‍याच्‍या इशारा निवेदनाद्वारे संघटनेच लखन सोनवणे , श्रावण कसबे, अजित बनसोडे, अविनाश भगत ,शेख जावेद आदिच्‍या सहया आहेत .याची एक प्रत गृहमंत्री, पोलिस अधिक्षक,  शहर पोलिस ठाणे आदिना देण्‍यात आले आहे.
 
Top