नळदुर्ग - तुळजापूर तालुक्‍यातील बोरगांव येथील रहिवाशी असलेल्‍या जवानाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना बुधवार रोजी सकाळी उत्‍तरप्रदेशातील बरेली कॅन्टोन्मेंट भागातील तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळुन या अपघातात कॅप्टन अविनाश यशवंत सोमवंशी– पाटील वय 26 वर्षे   (रा. बोरगांव (तुपाचे)ता. तुळजापूर) यांचा मृत्यू झाला .या घटनेची माहिती समजताच जिल्‍हायत सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे.
            कॅप्टन अविनाश यशवंत सोमवंशी–पाटील हे नळदुर्गपासुन जवळच असलेल्‍या बोरगाव तुपाचे येथिल रहिवाशी असुन त्‍याचे प्राथिमीक शिक्षण अकलुज येथे झाले. यशंवतराव विठ्ठलराव सोमवंशी-पाटील व सौ.धनेश्‍वरी या उभयताच्‍या पोटी अविनाश यांचा जन्‍म झाला. विठ्ठलराव  हे बोरगावं येथील सधनशील शेतकरी असुन त्‍यांना दिपक व अविनाश ही दोन  मुले व एक मुलगी ज्‍योती असुन या मुलीचे लग्‍न झाले आहे. एक वर्षापुर्वीच दिपक याचे   अकाली निधन झाले आहे. सैन्‍यदलात असलेला  अविनाश   19 मे 2014 या तारखेला सोनाली बरोबर उस्‍मानाबाद येथे त्‍याचा  विवाह झाला होता.  
        अविनाश हा त्‍यांच्‍या पित्‍याचा अत्‍यंत लाडका तर गावचा प्रिय अविनाश म्‍हणुन सर्वश्रुत आहे.  पुणे येथील खडकवासला एन डी ए येथे अविनाश यांचे लष्‍करी शिक्षण पुर्ण झाले .सन 2007 मध्‍ये डेहराडुन येथे प्रथम नेमणुक करण्‍यात आली . व याठिकाणी कॅप्टन अविनाश सोमवंशी यांचे लष्‍करी प्रशिक्षण झाले. त्‍यानंतर ते उत्‍तरप्रदेशातील बरेली कॅन्टोन्मेंट येथे कॅप्‍टन म्‍हणुन कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे बुधवार रोजी सकाळी हेलिकॉप्टरने कामासाठी बाहेर जात असताना हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच  ते कोसळले या अपघातात
           त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे वृत्‍त सर्वत्र प्रसारीत झाले. ही वार्ता बोरगांवसह उस्‍मानाबाद जिल्‍हयात समजताच नागरिकात हळहळ व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.
     दरम्‍यान गुरूवार रोजी सकाळी आविनाश यांचा पार्थिव बरेली येथुन पुणे येथे विमानाने अण्‍णयात येणार आहे. तेथुन दुपारी   त्‍यांच्‍या मुळ गावी  पार्थिवावर बोरगाव येथे अंतिम संस्‍कार करण्‍यात येणार असल्‍याचे बोंरगाव ग्रामपंचायत सदस्‍य मारूती बोनसोडे यांनी बोलताना सांगितले .

 
Top