उस्मानाबाद - राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार अणि प्रसार  होऊन त्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, खेळातील बदलेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाची पध्दती, नवीन खेळ व  खेळांची शास्त्रोक्त माहिती क्रीडा शिक्षकांना व्हावी, यासाठी पुणे येथे क्रीडा  शिक्षकांसाठी   राज्यस्तरीय  मास्टर्स ट्रेनर्सचे प्रशिक्षण शिबीराचे   आयोजन करण्यात आले आहे.
      इच्छुक क्रीडा  शिक्षकांनी  प्रशिक्षणासाठी विहीत नमुन्यात फॉर्म घेवून सविस्तर माहिती 13 ऑक्टोबर,2014 पर्यंत भरुन देणे आवश्यक आहे.  मास्टर्स ट्रेनर्सची निवड जिल्हा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद यांच्यावतीने मा.उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, लातूर यांच्या मान्यतेने निवड करण्यात येणार आहे.
    क्रीडा  शिक्षकांनी  या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ‍जिल्हा क्रीडा अधिकारी,उस्मानाबादशी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.               
 
Top