नवी दिल्ली - 'हुदहुद' जोरदार वा-यासह रविवारर सकाळी ताशी 195 किलोमीटर वेगाने विशाखापट्टणमला थडकले. नंतर या भागात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली.एनडीआरएफचे जवान आंध्रप्रदेश, ओडिशात तैनात आहेत. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी, श्रीकाकुलम, पश्चिम गोदावरी, विशाखापट्टणम, विजियानगरमला तर ओडिशामधील कोरापूट, मलकानगिरी, नबरंगपूर, रायगडा, गजपती, गंजमला वादळाचा धोका निर्माण झाला आहे.
तत्पूर्वी वादळाच्या तडाख्याच्या भीतीने आंध्र प्रदेश आणि ओडिशातील सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्
हवामान खात्यानुसार, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रच्या किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा धोका आहे. विद्युत पुरवठा ठप्प होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी वादळ विशाखापट्टणमहून 250, तर ओडिशाच्या गोपालपूरहून 350 किलोमीटरवर होते.
याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्‍या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
 
Top