उस्मानाबाद- जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनानुसार तुळजापूर येथे विधानसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. घुगे यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातंर्गत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
         या बैठकीस सहा.निवडणूक अधिकारी के. एच. पाटील, अति. सहा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, नायब तहसीलदार एन. एस.भोसीकर (निवडणूक),एन.बी. जाधव (पुरवठा} मिडीया कक्ष प्रमुख प्रा. व्ही.आर कागदे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आणि निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
         श्री. घुगे यांनी या बैठकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 370 मतदान केंद्र असून या त्यासाठी एकुण 3 हजार 772 मतदान अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. तुळजापूर मतदार संघात 3 मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तेथे मायक्रो ऑब्जरवची नियुक्ती करण्यात आली आहे.
         कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती काळजी निवडणूक विभाग व पोलीस विभागामर्फत घेण्यात येत आहे. शेवटच्या 4 दिवसाकरीता भरारी पथकाच्या फेऱ्यात वाढ करुन 6 स्थीर सर्वेक्षण पथकाची नियुक्ती  करण्यात येणार आहे. 36 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आचार संहितेचा भंग होणार नाही, याबाबत आदेशही देण्यात आले. प्रतिनिधींनी निवडणूक खर्च दररोज या कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही श्री. घुगे यांनी दिली.
        या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र क्रमांक 149 नगर परिषद कार्यालय, तुळजापूर हे मतदान केंद्र मॉडेल मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात येणार आहे. या केद्रांत मतदानाच्या दिवशी सी. सी. टी. http://192.168.1.170 संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच सी. सी. टी. व्ही. कॅमेराव्दारे लाईव्ह टेलिकॉस्ट करुन सर्व मतदार व सर्व जनतेस पाहता येईल.                  
 
Top