उस्‍मानाबाद -  डॉ. पद्मसिंह पाटलांनी केवळ स्‍वार्थासाठी नात्‍या गोत्‍यातील मंडळी गोळा करून मध्‍यवर्ती बँक, तेरणा कारखाना सारख्‍या सर्व संस्‍थाचे वाटोळे करण्‍याचे पाप राष्‍ट्रवादीच्‍या लोकांनी केले असे आरोप माजी पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांनी केला
    उस्‍मानाबाद येथील पुष्‍पक मंगल कार्यालयात कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वासराव शिंदे यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपिठावर उमेदवार विश्‍वासराव शिंदे, जिल्‍हा बँकेचे माजी उपाध्‍यक्ष नारायण समुद्रे, प्रदेश महिला उपाध्‍यक्ष  डॉ. स्मिता शहापूरकर, जि.प उपाध्‍यक्ष सुधाकर गुंड , माजी नगराध्‍यक्ष मधुकर तावडे, भाऊसाहेब उंबरे, अशोकराव पवार, यशपाल सरवदे, चंद्रकांत बागल, मागासवर्गीय जिल्‍हाध्‍यक्ष सिध्‍दार्थ बनसोडे, कळंबचे तालुकाध्‍यक्ष संजय घोगरे, युवक अध्‍यक्ष अनंत लंगडे, उस्‍मानाबादचे तालुकाध्‍यक्ष लक्ष्‍मण सरडे, शहराध्‍यक्ष समियोद्दीन मशायक, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, सुरेश शेरखाने, विजय मुद्दे उपस्थित होते.
 यावेळी पुढे बोलताना चव्‍हाण म्‍हणाले की, 35 वर्षापासून सत्‍तेत असूनही डॉ. पाटलांनी उस्‍मानाबादसाठी एकही उद्योग प्रकल्‍प चालविला नाही. उलट चालू संस्‍था लुटून उध्‍वस्‍थ केल्‍याचे आरोप केले . तरीही केवळ पैशाच्‍या जीवावर जिल्‍हयातील चारपैकी तीन मतदार संघात घरातील उमेदवार उभे केले. आहेत. परंतु सामान्‍य जनता यांची पैशाची मस्‍ती उतरविल्‍याशिवाय राहणार नाही. मी पालकमंत्री असताना उजनीच्‍या पाण्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा करून उस्‍मानाबादकरांना न्‍याय देण्‍याची भूमीका घेतली असे असताना राणा पाटील यांनी श्रेय घेण्‍याचे घाणेरडे राजकारण केले हे जनतेला माहित आहे.
   आ. ओमराजे यांनी आमदारकीची पाच वर्ष फक्‍त नौटंकी केली पण विकास कामे नाहीत केली. कॉंग्रेस पक्षच सर्व जातीधर्माला सोबत घेवून  या भागाची प्रमाणिक सेवा करू शकतो. त्‍यामुळे जनतेने दोन्‍ही दादांना नाकारून स्‍वच्‍छ प्रतिमेच्‍या आमच्‍या उमेदवारास मतदान करावे असे अवाहनही चव्‍हाण यांनी केले. सुत्रसंचालन गोरोबा झेंडे यांनी तर आभार आलीम शेख यांनी मानले. सभेसाठी मुहिब शेख, विनोद वीर, नितीन शेरखाने, उमेश राजेनिंबाळकर, प्रा. मोहन शिंदे, बालाजी साळुंके, बाळासाहेब मुंडे, शशांक सस्‍ते, धनंजय राऊत, अझहर पठाण, मिलींद गोवर्धन, अभिजीत देडे, देवानंद येडके आदींनी परिश्रम घेतले.
 
Top