नळदुर्ग -  तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असुन मतदाराशी डोअर टू डोअर व प्रत्‍यक्ष गाठी भेटी यावर आधिक भर दिला असल्‍याचे सांगुन अनेक ठिकाणी मोठया    प्रमाणावर पाठिबा मिळत असल्‍यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असुन मनसेचे उमेदवारदेवानंद रोचकरी यांचा  बहुमताने विजय होणार असल्‍याचा दावा मनसे मराठवाडा विभाग सरचिटणीस एस.के. जागीरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले .
   तुळजापूर विधानसभा मतदार संघातील जनता कॉंग्रे
स, राष्‍ट्रवादीसह भाजप, शिवसेनेवर नाराज  असुन सत्‍ताधा-यांनी  सहकारी संस्‍था बंद पडण्याचे काम केले. त्‍यावेळी विरोधकाची भुमिका न बजावता भाजप, शिवसेना देखील सहभागी आसल्‍याचा आरोप करून एस.के. जागीरदार यांनी सांगितले की, जनता या चारही पक्षावर नाराज व चिडलेली आहे. याचाच परिणाम म्‍हणून यावेळीच्‍या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनता मनसेच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी हे युवा उमेदवार असून ते या मतदार संघातील आहेत. देवराज मित्रमंडळ अधिक मनसे असे समीकरण या निवडणुकीत निर्माण झाले असून मतदार यावेळी मनसेला ऐतिहासीक विजय मिळवून देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. . मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विश्‍वास ठेवून या मतदार संघातील युवक मोठया संख्‍येनी  सामिल होत आहेत. यामुळे युवा शक्‍तीच्‍या जोरावर या मतदार संघात ऐतिहासीक कामगिरी करणार आहे. या मतदार संघात जोडलेल्‍या उस्‍मानाबाद तालुक्‍यातील 72 गावात देखील मनसेच आघाडीवर आहे. या 72 गावात मनसेच्‍या 43 शाखा सुरू करण्‍यात आल्‍या आहेत तर देवराज मित्रमंडळाच्‍या शाखाही या गावात असल्‍याने इतरापेक्षा या ठिकाणी मनसेच अग्रेसर असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे, एस.के. जागीरदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, देवराज युवा मंचचे जिल्‍हाध्‍यक्ष शिवाजी कांबळे, तालुकाध्‍यक्ष महंतेश पाटील तालुकाध्‍यक्ष पांडुरंग बोंगरगे, मनसेचे नळदुर्ग शहराध्‍यक्ष ज्‍योतिबा येडगे, उपाध्‍यक्ष रमेश घोडके, तालुका उपाध्‍यक्ष तानाजी खलाटे, मनसे परिवहन विभागाचे जिल्‍हाध्‍यक्ष मल्‍लीकार्जुन कुंभार, जिल्‍हा उपाध्‍यक्ष बशीर शेख, नळदुर्ग शहर उपाध्‍यक्ष अरूण जाधव आदी उपस्थित होते.
 
Top