उस्‍मानाबाद -: येथील श्री अनंतदास महाराजांच्‍या 51 व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या आणि महिला गटाच्‍या विविध स्‍पर्धांचे बक्षीस वितरण थाटात संपन्‍न झाले. प्रारंभी महाराजांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी व्‍यंकट नळगीकर होते. यावेळी सौ. विजया कुलकर्णी, गोविंदराव अयाचित, बाळू महाराज रामदासी, सुधाकर पाटील, एन.जे. कुलकर्णी आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
           बालवाडी ते दहावी पर्यंतच्‍या शालेय विद्यार्थ्‍यांची तसेच महिला व मुलींनी विविध आकर्षक बक्षिसे मिळविली. एकूण 16 शाळांमधील 300 पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 38 परिक्षकांनी स्‍पर्धांचे परिक्षण केले. आकर्षक बक्षिसे, शालेय साहित्‍य आणि प्रमाणपत्राचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरीक, विजेते स्‍पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्‍पर्धाप्रमुख उमाकांत कुलकर्णी यांनी केले तर सुधाकर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
Top