उस्मानाबाद - स्टेट बॅक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील पुरुषांसाठी दि.18-09-2014 ते 17-10-2014 या 30 दिवसाच्या कालावधीसाठी मल्टीफोन सेर्विसींग या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा निरोप समासंभ नुकताच नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी चंद्रशेखर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेचे स्टाफ आणि प्रशिक्षक श्री. गायकवाड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विकास गोफणे यांनी करुन प्रशिक्षण आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सरवदे यांनी आभार गणेश कलशेट्टी यांनी मानले.   
 
Top