पांगरी (गणेश गोडसे)  मुलाबरोबर असलेल्या भांडनावरून घरात घुसून महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान करत तिला मारहाण केल्याची  घटना काल दि.6 सोमवारी रात्री 11 वाजता मांडेगाव ता.बार्शी येथे घडली.केसरबाई विष्णु मिरगणे वय 57 रा.मांडेगाव असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून पिंटू उर्फ अरविंद नवनाथ मिरगणे व अनोळखी पाचजण अशी मारहाण करून सोन्याचे दागिने घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
  केसरबाई मिरगणे या महिलेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या रात्री घरात असताना आरोपी पिंटू यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन दारूच्या नशेत त्यांच्या घरात प्रवेश करून मुलगा पंडित कुठे गेला आहे असे विचारून फिर्यादी  केसरबाई यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र,बोरमाळ असे सोन्याचे दागिने जबरीने काढून घेत त्यांच्या गळ्यावर ओरखडे ओढले.तसेच इतरांनी सवयपाक घरात प्रवेश करून घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली.तसेच गावातील अंबादास शिवाजी काकडे व जनक लक्ष्मण मिरगणे यांनाही शिवीगाळ करून धककाबुकी करण्यात आली॰केसरबाई मिरगणे यांच्या फिर्‍यादिवरून आज सकाळी पांगरी पोलिसात सहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top