पांगरी - पांगरी ता.बार्शी येथे आरोग्य सेवेसाठी कोट्यावधी रुपयांची यंत्रणा कार्यान्वित असतांनाही केवळ रुग्णालयातील व 108 या योजनेतील वैद्यकीय अधिकार्‍याभावी अनेक रुग्णांना आपल्या जीवाशी खेळावे लागत असल्याचा प्रत्यय काल दि.16 रविवारी रात्री पांगरी येथील रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना आला असून नशीब बलवत्तर म्हणून एकाचे प्राण वाचले आहेत.आबासाहेब लिंबराज खिंडकर वाया 42 रा.पांगरी असे सूदैवाणे प्राण वाचलेल्याचे नांव आहे.पांगरीतील आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याचे उघड झाले असून दिड तास डॉक्टरची वाट बघून संतप्प्त नागरिकांनी याचा जाब कोणाला विचारायचा असे म्हणत रुग्णालयातून रुग्णासह काढता पाय घेतला व पुढील उपचार केले.
  याबाबत अधिक माहिती अशी की रात्री अंधारात आबा खिंडकर यांना घरासमोर कशाचा तरी दंश झाल्याचे जाणवले॰त्यांनी याबातची माहिती नातेवाईकांना दिली.नातेवाईकांनी रात्री 8.30 वाजता तिन वैद्यकीय अधिकारि,एक वैद्यकीय अधीक्षक व 30 कर्मचार्‍यांचा ताफा असलेल्या पांगरीच्या ग्रामीण उपचारासाठी दाखल केले.मात्र तेथे गेल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना उस्मानाबाद येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचे फरमावण्यात आले.दरम्यान पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख यांनी 108 सेवेला माहिती दिली.मात्र त्यावेळेस 108 रुग्णवाहिकेमधील डॉक्टर हे अनुपस्थित असल्यामुळे रूग्णाला दिड तास ताटकळत बसावे लागले.दरम्यान रुग्णाची परिस्थिति खालावत असल्याचे लक्षात घेऊन नातेवाईकांनी रुग्णास पुढील उपचारासाठी अन्यत्र घेऊन जावून त्याचे प्राण वाचवले.
  पांगरीतील आरोग्य सेवा सुधारावी व रात्री अपरात्री 108 गाडीत कायम डॉक्टर ठेवावा अशी मागणी पांगरी ग्रांमपंचायतीनेहि एका लेखी निवेदनाद्वारे यापूर्वीच केलेली आहे.मात्र तरीही याकडे संबंधितांनी कानाडोळा केला असल्याचे रात्रीच्या घटनेवरून उघड होत आहे.किमान आता तरी संबंधितांनी लक्ष देऊन येथील यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा आंदोलनाचे पर्याय जनतेला स्वीकारावे लागतील अशी मागणी पांगरी परिसरातून होत आहे.
चौकट: 108 या आरोग्य सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचत असतांना फक्क्त वैद्यकीय अधिकार्‍याभावी पांगरीतील रुग्णाची हेळसांड होत असल्याचा प्रकार लाजिरवाणा आसल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
 
Top