उस्मानाबाद -  माहे डिसेंबर मध्ये मुदत संपणा-या, विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणूकीत आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी  करण्यासाठी संबंधित तालुक्यातील  गटविकास अधिकारी यांची आचारसंहिता प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आल्‍याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
             जिल्हयात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. तसेच राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करावी तसेच संबधित तहसीलदारांना निवडणूक कामी सहकार्य करुन मुदती संपणाऱ्या ग्राम पंचायतीच्या पार पाडण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या. 
 
Top