उस्मानाबाद - महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, उस्मानाबादतफे उस्मानाबाद येथे  सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीसांठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन  प्रशिक्षण कार्यक्रम 13 ते 25 नोव्हेंबर या 10 दिवसीय कालावधीत  आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चाऱ्यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पकिंग, दुध विक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबाद शेळीचे महत्व, करड्याची निगा,  शेळीचे लसीकरण, आहार व आजाराविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच अर्ध  बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया जाती, कुक्टपालनामध्ये गावरान व बॉयलर याची माहिती, खादयांची  व शेडसची माहिती, विमा, आजाराविषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तीचे मार्गदर्शन व यशस्वी उदयोजकांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
    तसेच उदयोजकीय संभाषण, कौशल्य, उदयोजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शासकीय कर्ज प्रस्ताव, अहिल्याबाई होळकर महामंडळाची  तसेच नाबार्ड आदि विषयाची माहिती दिली जाणार आहे. इच्छुक युवक-युवतींनि अधिक  माहिती व अर्जासाठी कार्यक्रम आयोजक, सुशांत गायकवाड, मो. नं. 9403866242 महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उदयोग केंद्र, उस्मानाबाद यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे, एम. सी. ई. डी. उस्य्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top