उस्मानाबाद - डेंग्यु हा रोग विशिष्ट विषाणुमुळे होतो.  या रोगाचा प्रसार एडीस एजीप्टाय डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती  स्वच्छ पाण्यात म्हणजेच सिमेंटच्या टाक्यातील पाणी, रांजण, प्लॉस्टीक बादल्या, रिकाम्या, घरातील शोभेच्या कुंडया, निरोपयोगी टायर्स, तुंबलेल्या नाल्या, गटारीच्या  पाण्यात उत्‍पती  झाल्यामुळे डेंग्यु, चिकनगुणीया या रोगाचा फैलाव होतो. या रोगाचा उद्रेक होवू नये, वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना  करुन साथरोगाचे उच्चाटन करावे. साथरोग नियंत्रणासाठी निधीची  कमतरता कमी पडु दिली जाणार नसल्याची माहिती   डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कीटकजन्यरोग  प्रतिबंधक उपाययोजना डेंग्यु साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत डॉ. नारनवरे यांनी माहिती दिले.
    या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. फुलारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. के. डी. लोमटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  एम. आर. पांचाळ, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी  निला धनराज, पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दुबाकले राजेंद्र, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक,  वैद्यकीय अधिकारी हिवतापचे श्री. बोरळकर आदि उपस्थित होते.
    डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, डेंग्यु, चिकनगुनिया रोगाचे उच्चाटन करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात एक दिवस कोरडा दिवस पाळावा, प्रत्येक कार्यालय, विद्यालय, अंगणवाडी, महाविद्यालय, शाळा, ग्रामपंचायत, रुग्णालयात आदि ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवावी. जनजागृतीसाठी रॅली काढण्यात यावी. हात धुवाचा कार्यक्रम घेण्यात यावा. सर्वांनी गटारी, खड्डे, नाल्याची  परीसराची  साफसफाई करावी. डासाच्या  निर्मुलनासाठी औषधाचा व फवारणी करावी,अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
साथरोग गरोदर मातांना अगोदर पसरण्याची शक्यता असल्याने साथरोग  टाळण्यासाठी येत्या 14 नोंव्हेंबर रोजी जिल्ह्यात  विशेष मातृत्व संवर्धन दिनाचा कार्यक्रम आयोजित करुन गरोदर मातांची संपूर्ण  शारिरीक तपासणी करावी. साथरोग व इतर आजार तपासणीत आढळून आल्यास  तात्काळ औषधोपचार  करावा. जिल्ह्यातील  सर्व ग्रामपंचायतीत  विशेष ग्रामसभा 15 रोजी घेवून साथरोग नियंत्रणासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घ्यावा. या दिवशी सर्व गाव, परिसर स्वच्छतेची मोहिम राबवावी साथरोग  नियंत्रणासाठी  समाजातील सर्व घटकाने योगदान दयावे, साथरोगाचे नियंत्रणासाठी सर्व रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधी, गोळया, रक्तसाठा  ठेवण्याचे  निर्देशही डॉ. नारनवरे यांनी आरोग्य यंत्रणेला  यांनी दिले.
प्रारंभी आरोग्य विभागातर्फे ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे 26 रुग्ण, विषमज्वरचे 69 रुग्ण, तापीचे 424 रुग्ण, कावीळचे 7 रुग्ण, गॅस्ट्रोचे 196 रुग्ण असे एकुण 722 रुग्ण शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल  झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ताप उद्रेक कमी करण्यासाठी उस्मानाबाद शहरात ॲबेट कार्यक्रम कृतिनियोजन आराखडा तयार करण्यात आला. 
 
Top