उस्मानाबाद -  तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे सुरु आहेत.  या विकास कामांचा सर्व शासकीय यंत्रणेने प्रत्येक कामांचा क्लोजींग रिपोर्ट तात्काळ तयार करुन सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
    तुळजापूर येथील  सर्कीट हाऊस येथे तुळजापूर विकास प्रधिकरणाची बैठक डॉ.नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.  जिल्हा नियोजन अधिकारी एम.के.भांगे, गुण नियंत्रणचे  सलगरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एस. बुबणे, प्रशासकीय सल्लागार ज्ञानोबा फुलारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजित हांडे, प्राधिकरणाचे तांत्रीक सल्लागार दराडे, नगर अभियंता एम.आर.फारुखी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
    बैठकीत डॉ. नारनवरे म्हणाले की, प्रत्येक कामाचे क्लोजर रिपार्ट सादर करतांना कामांची सुरुवात व कामांचा शेवट कधी झाला. ते काम किती कालावधीसाठी दिले होते. ते किती दिवसात पूर्ण झाले. बारचार्ट, मेजरमेंट गोषवारा, कामांबाबतचे आक्षेप, संबंधित विभागाला कधी हस्तांतरण केले त्याचा अहवाल आदि त्यासोबत जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शहरात प्राधिकरणाची  42 रस्ते विकसीत करणेसाठी 6 कंत्राटदारांकडून हे काम करुन घेतले जात आहे, बीडकर तलाव  येथे बगीचा विकसित करणे, भवानी मंदीर ते शुक्रवार पेठ पाण्याची टाकी पर्यंत रस्ता रुंदीकरण व विकास, शहरसाठी नवीन भूयारी गटार योजना, पापणाश तलावाची खोली वाढविणे व सुशोभिकरण करणे, विद्युतीकरणाच्या कामावर सनियंत्रण ठेवण्यासाठी कामांबाबत मागणी नोंदविणे, बारचार्ट प्रमाणे कामे करणे आदि कामांचा आढावा घेतला.
तुळजापूर विकास प्राधिकरणाची कामे वेळेत सुरु न करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ नोटीसा बजावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. प्राधिकरणाच्या कामांचा गती येण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केल्यासच प्रलंबित कामांना गती येणार आहे. कंत्राटदारांनी बारचार्ट वेळेत देणे बंधकाकरक आहे. आपल्याकडे देण्यात आलेली कामे विनाविलंब पूर्ण करावीत. या कामांवर पर्यवेक्षणीय दिरंगाई करणाऱ्या शासकीय यंत्रणांनेतील  अभियंत्यावर कार्यवाही केली जाईल. जीवन प्राधिकरणाने शहरातील ड्रेनेज व पाणीपुरवठयाची कामे तात्काळ पूर्ण करावीत. यासाठी नगर पालिका व संबंधित विभागाने दिलेल्या कामांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी.या सर्व कामांवर गुण नियंत्रणकाचे विशेष लक्ष देऊन अहवाल द्यावा,अशीही सूचना त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना केली.  
डॉ. नारनवरे यांनी यावेळी वगळण्यात आलेला भाग याचीही बैठक यावेळी घेतली. त्यावेळी त्यांनी  याबाबतचा नकाश तयार करणे. तसेच आंबेडकर चौक ते कमान वेस रस्ता, शिवाजी दरवाजा ते पार्कींग, महाद्वार ते राष्ट्रीय महामार्ग , पावन लॉज ते पार्कीग  या वगळण्यात आलेल्या भागाचा नकाशाचे अवलोकन केले. या भागातील संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेतले. या कामांना किती निधी लागणार आहे याचे अंदाजपत्रकीय विवरणपत्र तयार करुन शासनास मागणी सादर करण्याच्या सूचना दिल्या. या कामांपैकी किती सुरु करता येईल याचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.  या बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
 
Top