उस्मानाबाद -  जिल्हयातील माजी सैनिक/युध्दविधवा/विधवांसाठी  हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या रिटेल आऊटलेट डिलरशिप साठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. 1. मरणोत्तर शौर्यपदक विजेत्यांच्या विधवा/ आश्रीत. 2. कर्तव्य बजावत  असताना मरण पावलेल्यांच्या विधवा/ आश्रीत. 3.कर्तव्य काळात अपंग झालेले कर्मचारी. 4. सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा/आश्रीत. 5. इलिजीबल सेवारत/माजी सैनिक. तसेच उमेदवारांना ज्या डिलरशिपसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना पुरस्कृत करणाऱ्या Dir Gen of Resettlement (DGR) यांचेकडून मिळालेल्या पत्राची प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी DGR कडे अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र पाठवुन पात्रता प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करुन घ्यावे.
    सदर जाहिरात दै. टाईम्स ऑफ इंडिया (इंग्रजी) मध्ये दि. 24-10-14 रोजी तर दै. लोकमत (मराठी) या वृत्तपत्रात दि. 26-10-14 रोजी प्रसिध्द झालेली आहे. सर डिलरशिपचया नियुक्तीसाठी अर्ज/ प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 26-11-14 आहे. तरी जिल्हयातील पात्र उमेदवारांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड (रिटेल आऊटलेट डिलरशिप) च्या नियुक्तीसाठी अर्ज करावेत असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी  एका पत्रकाव्दारा केले आहे. 
 
Top