उस्मानाबाद -  जिल्ह्यात  शांतता व सुव्यवस्‍था कायम रहावी, म्हणून  अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 14 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 6 पासून ते 28 नेंव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील.
    आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश  आज जारी करण्यात आले असून ते 28 नोंव्हेंबर रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. 
 
Top